Sunday 29 January 2012

Digitally Altered - बिस्मिल्लाह तेरे नाम से ही शुरू हुआ, तेरे नाम पे ही खतम ये लीला



[gallery link="file" columns="1" orderby="rand"]




 हा post  मी "बिस्मिल्लाह तेरे नाम से ही शुरू हुआ, तेरे नाम पे ही खतम ये लीला" यातील फोटो एडीट करून बनविला आहे. यातील सर्व फोटो पिकासा 3.9.135.80 हे version वापरून एडीट केले आहेत. खरच Picasa मस्त image editing tool आहे. Common people साठी तर एकदम सोपे आणि झकास आहे......Thanks Picasa.


बिस्मिल्लाह तेरे नाम से ही शुरू हुआ, तेरे नाम पे ही खतम ये लीला

गोलघुमट
गोलघुमट
हा फोटो काढला आहे २००९ मध्ये.बंगलोर वरून गावी येत होतो.direct बस न्हवती म्हणून विजापूरची बस पकडली होती.सकाळी ९ ला विजापूरला पोहोचलो.नंतर कळले कि विजापूर मध्ये गडबड चालू आहे म्हणून बसेस लेटआहेत.काय करावे विचार केला.वेळ तर खूप होता म्हणून गोलघुमट पाहायला निघालो आणि दंगलीत सापडलो.माझ्यासमोरच बस टायर जाळत होते आणि गडबड चालू होती.एकदा मनात देवाचे नाव घेतले आणि तसाच दंगलीतून वाट काढत पुढे निघालो.फोटो ही घेतले गुपचूप पण ते परत कधी तरी upload करेन.गोलघुमट मध्ये मी एकटाच होतो.सकाळी १०.३० ला हा फोटो घेतला आहे.मला कबरीवरचा जो प्रकाश आणि सावलीचा खेळ होता तो capture करायचा होतो आणि नशिबाने मला तसे फोटो भेटलेही.त्याच बरोबर एक गाणे हि मनात आले जे या फोटो साठी एकदम perfect आहे. कैलाश खेर यांच्या चंदन मे या अल्बम मधल्या या ओळी आहेत. "बिस्मिल्लाह तेरे नाम से ही शुरू हुआ तेरे नाम पे ही खतम ये लीला."

Friday 27 January 2012

शिवाजी महाराजांचे तेज

शिवाजी महाराजांचे तेज
शिवाजी महाराजांचे तेज
सूर्याचे नशीब एवढे थोर आहे कि तो खुद्द शिवाजी महाराजांचे तेज बनला आहे.असे तर नाही ना की स्वतः सूर्यच खुद्द शिवाजी महाराजांचे तेज घेवून आपल्याला जीवन देतो.....?

Monday 23 January 2012

Attitude

Attitude
Attitude
आम्ही तिघेजण रायगड फिरत होतो. जगदीश्वराच्या वाटेवरती होतो. संतोष फोटो काढत होता.तो कोणी फोटोग्राफर नाही आहे किंवा आम्ही ही मॉडेल नाही आहोत.पण म्हणून काय झाले,Just हुक्की आली. त्याला म्हणालो "अरे, एक फोटो काढ ना पण पाठमोरे".मी आणि दत्ता उभे राहिलो आणि संतोष ने click केले.आज चा post लिहिताना वाटले याच फोटोवर लिहावे.काय सांगत असावा हा फोटो? "राहे बहोत है लेकीन मंझील नही मिल रही" असा negative विचार तर देत नाही ना? क्षणभर चमकलो या विचाराने.आणि दुसऱ्याच क्षणी विचार मनात आला कि "अरे महाराजांच्या राजधानीवर काढलेला फोटो Negative विचार देवूच शकत नाही.सह्याद्री नेहमी बळच देतो. नीट फोटो पाहिला तर luckily आम्हा दोघांची body language सुद्धा cool, confident आणि positive आहे.उलट हा फोटो सांगत आहे कि, 'कितनी भी मुश्किले हो राहो मे हम तो मंझिले पा कर रहेंगे.'"

Friday 20 January 2012

सूर्य आणि दिवेआगार बीच



सूर्य आणि दिवेआगर बीच
 सूर्य आणि दिवेआगर बीच
सायंकाळी 5 च्या सुमारास दिवेआगार बीचवर घेतलेला हा फोटो आहे.तळपत असलेला सूर्य आहे,समुद्र आहे,पाऊल ठसे आहेत आणि घोडागाडीच्या चाकाचासुद्धा ठसा आहे. जीवनसुद्धा असेच आहे ना ! जीवन समुद्र आहे,आशेचा सूर्य आकाशात तळपत आहे.पण आपण नेहमी जीवन समुद्रात पोहण्याचा आनंद न घेता किनार्यावरच ये जा करतो.काळ कधी आपले पाऊल ठसे मिटवेल सांगता येत नाही.आपली पावले नेहमी संभ्रमात असतात कि समुद्रात जावे का नको.आणि आपण किनार्यावरच थांबतो.सुख दुख तर येंतच असतात पण आपण का थांबायचे?मस्त समुद्रात पोहायचे.मग किती हि उन्हाचे चटके बसू देत.आशेचा सूर्य कवेत येत नाही म्हणून काय झाले तो दिसत तर आहे.

Thursday 19 January 2012

दोन सूर्यांची भेट

दोन सूर्यांची भेट
दोन सूर्यांची भेट
commonmanclick चा  पहिलाच post आहे. कुठून सुरुवात करावी बरे? माझ्या देवापासून सुरुवात करावी.रायगडला महाराजांच्या दर्शनासाठी गेलो होतो.पहाट होती.एका सूर्याचे दर्शन घ्यायला दुसरा सूर्य येत होता.मला तो क्षण क्लीच्क करायचा होता पण professional कॅमेराचा प्रश्न होता. कोठून आणावा बरे कॅमेरा? शेवटी महाराजांची शिकवण उपयोगास आली.जेवढे आहे त्यातूनच निर्मिती करायची.जेवढे साधन उपलब्ध आहे त्यातूनच जेवढे चांगले घडवता येईल तेवढे चांगले घडवायचे.Mobile ला कॅमेरा आहे.बस्स ठरले यातूनच एक आठवण click करायची.दोन सूर्यांची भेट कॅमेरा मध्ये साठवायची.फोटो घेताना असे वाटत होते की खुद्द स्वतः आकाशाचा स्वामीच या धरतीच्या स्वामीचे तेज बनला आहे.आणि commonmanclick साठी पहिला post या दोन सूर्याचे दर्शन घेवून करायचा.