Sunday, 29 January 2012

बिस्मिल्लाह तेरे नाम से ही शुरू हुआ, तेरे नाम पे ही खतम ये लीला

गोलघुमट
गोलघुमट
हा फोटो काढला आहे २००९ मध्ये.बंगलोर वरून गावी येत होतो.direct बस न्हवती म्हणून विजापूरची बस पकडली होती.सकाळी ९ ला विजापूरला पोहोचलो.नंतर कळले कि विजापूर मध्ये गडबड चालू आहे म्हणून बसेस लेटआहेत.काय करावे विचार केला.वेळ तर खूप होता म्हणून गोलघुमट पाहायला निघालो आणि दंगलीत सापडलो.माझ्यासमोरच बस टायर जाळत होते आणि गडबड चालू होती.एकदा मनात देवाचे नाव घेतले आणि तसाच दंगलीतून वाट काढत पुढे निघालो.फोटो ही घेतले गुपचूप पण ते परत कधी तरी upload करेन.गोलघुमट मध्ये मी एकटाच होतो.सकाळी १०.३० ला हा फोटो घेतला आहे.मला कबरीवरचा जो प्रकाश आणि सावलीचा खेळ होता तो capture करायचा होतो आणि नशिबाने मला तसे फोटो भेटलेही.त्याच बरोबर एक गाणे हि मनात आले जे या फोटो साठी एकदम perfect आहे. कैलाश खेर यांच्या चंदन मे या अल्बम मधल्या या ओळी आहेत. "बिस्मिल्लाह तेरे नाम से ही शुरू हुआ तेरे नाम पे ही खतम ये लीला."

No comments:

Post a Comment