Sunday, 10 March 2013

Life Boost

Life Boost
Life Boost
Life Boost
Life Boost
Life Boost
Life Boost
Life Boost
Life Boost
ही रंगपंचमी आहे हरिहरेश्वर येथील.भरतीच्या वेळेस हा भाग पाण्याखाली असतो. आणि भरती ओसरली कि परत एकदा हा शैवाल समूह आपली कला दाखवायला तयार होतो.

इथे भरतीच्या वेळेस लाटांच्या प्रचंड माऱ्याने डोंगरसुद्धा कापला गेला आहे. शतकानुशतके चाललेल्या या लढाईत न समुद्र मागे सरकायला तयार आहे ना सह्याद्री. आणि या अस्थिर असणाऱ्या वातावरणात हा शैवालसमूह आपला जीवन विकास साधत आहे. यांना ना जोरदार लाटांची भीती आहे ना कापणाऱ्या दगडांची. यांचे मूळ ज्यामध्ये तो दगडाचा पायाच कधी हि उखडला जावू शकतो. पण यांना याची काहीच फिकीर नाही. फक्त स्वताचा विकास हेच यांचे ध्येय आहे आणि हाच यांचा ध्यास आहे.

आपल्या अवती भवति अनेक माणसे अशी सापडतील ज्यांना काहीच ध्येय नाही आहे किंवा ध्येयापासून लांब गेली आहेत. समाज,स्वकीय, परकीय आणि हो स्वताला हि भिऊन आपले ध्येय, आपली आवड मारायची आणि त्यांना आवडेल, रुचेल त्या साच्यात स्वताला बनवून घ्यायचे. मग लोक आपल्याला मानतात. आपल्या प्रगतीचे? कौतुक करतात. आणि आपण आपले मन मारत,प्रगती झाली असे समजत आयुष्य अक्षरश: निकालात काढतो. या कुणाच्या खिजगणतीत नसणाऱ्या या शेवाळयांनी हाच प्रश्न मला विचारला की काही माणसे अशी का वागतात, दुसर्यांना रुचेल, आवडेल अशी का बनतात. त्यापेक्षा आमच्या सारखे सतत लढत राहून आपल्या आयुष्याची रंगपंचमी का करत नाहीत? जीवन विकास का साधत नाहीत?

जे लढले ते थोर झाले.त्यांच्या आयुष्याची रंगपंचमी झाली.जे नाही लढले ते काय झाले हे ज्याचे त्याने ठरवावे.

No comments:

Post a Comment