Tuesday, 31 July 2012

निसर्गचित्र

निसर्गचित्र
निसर्गचित्र
कधी कधी देवालाही वाटते की हाती कुंचला घेवून मस्तपैकी portrait करावे, एखादे निसर्ग चित्र काढावे. जेव्ह्वा तो अशी कलाकृती घडवतो तेंव्हा त्यातून एक अजरामर कलाकृती घडते.....

असेच potrait मला पाहायला भेटले किल्ले पुरंदरवर. हा portrait चितारला आहे खुद्द संभाजी महाराजांच्या जन्मस्थानी. देवमाणसासाठी देवानेच घडवलेले हे निसर्गचित्र .......

Saturday, 28 July 2012

झरोका

झरोका
 झरोका
झरोका
 झरोका
झरोका
 झरोका
झरोका
 झरोका
झरोका
 झरोका
झरोका
झरोका (Black & White Image)
झरोका
झरोका (Black & White Image)
सध्या पावसाचे दिवस चालु आहेत. फिरायचा हाच एकदम मस्त मौसम आहे. निसर्ग सतत आपले रंग याच दिवसात बदलतो.या वर्षी पाउसमान कमी आहे. का कमी आहे माहीत नाही. कोणी माणसाला दोष देतो कोणी निसर्ग बदलत असतो म्हणून सांगतो. पण नक्की काय होत आहे ते समजत नाही.

असाच १४ जुलै ला देहु ला गेलो होतो.नशिबाने त्याच दिवशी तुकाराम महाराजांची पालखी परत पंढरपुरवरून आली होती. मंदिरात दर्शन घेतले आणि वैकुंठगमन मंदिराकडे निघालो. सहज भंडारा ड़ोंगराकड़े पाहिले तर तिथे काही काळे ढग जमले होते. आणि हळू हळू ढगात झरोका निर्माण होऊ लागला. पहिल्यांदा २ black & white फोटो घेतले पण त्यात मजा नाही आली. शेवटी color फोटो घेतले.

कुठला फोटो उत्तम आहेच हेच समजले नाही म्हणून सगळेच फोटो इथे देवू वाटले.

तो खेळ पहाताना उगीचच मनात कुठे तरी वाटत होत की तुकाराम महाराज तर झरोक्यातून आपल्याला पाहत नसतील ना....?

Sunday, 1 July 2012

भीमा नदी

भीमा नदी
 भीमा नदी
तुलापुरला भीमा, भामा आणि इंद्रायणी या ३ नद्यांचा त्रिवेणी संगम आहे त्यापैकी हा फोटो भीमा नदीचा आहे. मला त्या दिवशी का कोणास ठावुक पण nature फोटोग्राफीसुद्धा Black & White मध्येच करू वाटली.तुम्हालाही हा फोटो आवडेल अशी अपेक्षा करतो.

संथ वाहणारी भीमा नदी, मंदिराच्या पायर्या, पायर्यांवर असणारा कुत्रा आणि आसपासची झाडे यांनी या फोटोला वेगळ्याच विश्वात नेवून ठेवले आहे.

भक्ति

भक्ति
भक्ति
तुलापुरला हे आजोबा भेटले. त्रिवेणी संगमाजवळ देवाच्या नामसंकिर्तनात एकटेच बसले होते. जगाची थोड़ीसुद्धा जाणीव न्हवती. त्यांना disturb न करता फोटो घ्यायचा होता. पण ते सारखे एक जागेवर बसत न्हवते.मी फोटो घ्यायला गेलो की ते जागा बदलायचे. ते मुद्दाम असे करत न्हवते आणि मी किती ही वेळ थांबू शकत होतो आणि मला त्यांचा natural फोटो हवा होता. शेवटी तो भेटला.एक ठिकाणी ते विसाव्यासाठी बसले आणि मी लगेच हा माझा पहिला Black & White फोटो क्लिक केला.

Sunday, 17 June 2012

निसर्ग आणि मानवी संगम

संगम
निसर्ग आणि मानवी संगम
आजच पाउस चालु झाला आणि मनात २ वर्षापुर्वीच्या आठवणी मनात जाग्या झाल्या. हां फोटो घेतला आहे सिंहगड किल्ल्यावरून. Nikon coolpix  ची Panaroma  functionality पहिल्यांदा वापरली.मला मुठा नदी, पुणे शहर आणि भरून आलेले ढग एकाच क्लिक मध्ये capture करायचे होते आणि Panaroma mazya मदतीला आला. अस वाटत आहे की घरांच्या नदीचा आणि मुठा नदीचा संगम होत आहे.मी या फोटोवर जास्त लिहुच शकत नहीं कारण निसर्गाने एवढे फोटोत भरून दिले आहे की कशावर किती आणि काय लिहावे तेच समजत नाही आहे. अशावेळेस फक्त फोटोचा आनंद घ्यायचा असतो आणि मनात आठवणी जाग्या करायच्या असतात.....

Saturday, 2 June 2012

कारंजा, वृन्दावन गार्डन

कारंजा, वृन्दावन गार्डन
 कारंजा, वृन्दावन गार्डन
४ वर्षापुर्वीचा हा फोटो आहे. बंगलोरला रहात होतो. खुप दिवसापासून इच्छा होती कैमरा घ्यावा. पैसे जमवले, एकटाच रहात होतो.पैसे साठवले आणि भावाच्या लग्नाचे निमीत्त झाले आणि Nikon  Coolpix  कैमरा घेतला.मैसूरला गेलो,वृन्दावन गार्डन मध्ये. रात्रीचा flash मारून फोटो काढले आणि फोटो पाहिले. एवढे खराब फोटो आले होते.कधी कैमेराच handle  केला नव्हता. फक्त manual वाचून functionality  शिकून फोटो काढले होते. रात्रीचे ८ वाजले होते. ९ ला बाग़ बंद होते.खुप वाईट वाटत होते आणि स्वतावर राग पण येत होता.एका ठिकाणी स्थिर बसालो.उदास वाटत होते. आणि मनात आले जे उपलब्ध आहे त्यातून जो उत्तम देण्याचा प्रयत्न करतो तोच खरा कलाकार. मी कलाकार नाही आहे.पण मन जोपर्यंत शांत होत नाही तोपर्यंत मी प्रयत्न सोडत नाही. थोडा कैमरा नीट पाहिला. shaalet शिकलेलो science चे rule apply  केले. काही कैमराचे मोड change केले. flash बंद केला.आणि just  क्लिक केले. आणि हा फोटो आला.मग काय नुसता हवेत तरंगत होवून फोटो काढत इकडे तिकडे पळत होतो. वेळ कमी होता ना...! आज ही मला त्या दिवशी शिकलेले साथ देते.फक्त या फोटोत जे तारीख आणि वेळ आहे ती हां फोटो ख़राब करते.बेसिक फोटोग्राफर कधीच तारीख आणि वेळ फोटोत दिसून देत नाही.मी काढलेल्या सगळ्या जुन्या फोटोत तारीख/वेळ आहे.पण आता मात्र मी कटाक्षाने तारीख/वेळ आणि flash  फोटो काढताना वापरत नाही.आज माझ्याकडे फक्त मोबाइल कैमरा आहे पण त्यातूनसुद्धा उत्तम फोटो काढायचा प्रयत्न करतो....बघुया किती उत्तम जमते ते. Professional कैमरा घ्यायचा विचार आहे पण नाही म्हणून काही हरकत नाही आहे. मोबाइल कैमरा तर आहे.....हां एक मात्र आहे मी आता कधीच Flash  वापरत नाही आणि तारीख/वेळ सुद्धा फोटोवर येवून देत नाही..... :-)

रामटेक आणि क्षितिज

रामटेक आणि क्षितिज
रामटेक आणि क्षितिज
कधीतरी वाटत आपणही असच क्षितिजात हरवून जाव...
असच वाटल होत रामटेकवरून  हे विहंगम दृश्य पहाताना.....