Tuesday, 16 October 2012

प्रवाह

प्रवाह
प्रवाह
कधी कधी आयुष्य एकदम उदास होवून जाते. मनावर अशी एक मळभ येते. आयुष्य नकोसे वाटते. जेंव्हा कोणीच आपल्याला समजून घेत नाही असे वाटते तेंव्हा मी निसर्गात जातो आणि मनाची उभारी घेवून परत येतो.

या फोटोतसुद्धा अशीच एक उभारी मी टिपण्याचा प्रयत्न केला आहे. माणसात असणारा एक माणूस जेंव्हा स्वताकडे, आपल्या आतल्या आवाजाकडे पहातो तेंव्हा तो वेगळा दिसतो. मग कितीही मळभ येवू दे, स्वताला कितीही नैराश्य येवू दे जर त्याने स्वताच्या आतील वेगळ्या प्रवाहाकडे पाहिले तर तो नक्कीच उभारी घेवू शकेल.माणसांच्या गर्दीत स्वताला हरवू नये.लालच देणाऱ्या दिव्यांनी स्वताला भुलवू न द्यावे.आपली वाट स्व वर विश्वास ठेवून चोखाळावी.सांजवेळेस पाण्यात दिसणारा एक वेगळा प्रवाह हेच तर सांगतो.

No comments:

Post a Comment