तलाव |
तलाव |
मित्रांबरोबर हिंजवडीच्या मागे एक पवना धरणाकडे जाणारा रस्ता आहे तिकडे फिरायला गेलो होतो.ठिकाणाचे नाव माहित नाही. प्रसिद्द ठिकाण नाही आहे हे काही.फोटोत जे नाव दिले आहे ते एक गाव आहे तिथले.त्याचेच नाव दिले आहे स्थळ म्हणून. पण येणाऱ्या काळात प्रसिद्द ठिकाण होईल सुद्धा. पर्यटन क्षेत्र बनेल सुद्धा. मग तिथे माझे जाणे बंद होईल कारण एकदा गर्दी वाढली कि मला ती ठिकाणे नकोशी वाटतात. कारण तिथे निसर्ग भेटत नाही तर एक माणसाने घाण केलेला, ओरबाडलेला निसर्ग रहातो. त्याची मनाची तगमग मग पहावत नाही.
४ गाड्या आणि आम्ही आठजण निघालो. वेळ कमी होता. पण भटकंतीला कधी काळवेळ आणि ठिकाण नसते. फक्त मनसोक्त फिरा,निसर्गाचा आनंद घ्या,मुक्काम किंवा ठिकाणच ठरलेले नसल्याने फक्त जिथपर्यंत जाता येईल तिथपर्यंत जायचे आणि मागे फिरू वाटले कि फिरायचे, थोडीशी स्वताची आणि निसर्गाची काळजी घ्यायची. तसेच आम्ही केले. या भटकंतीला थोडीशी काळी किनारसुद्धा होती. कारण एक कुत्रा अचानक मध्ये आल्याने आमच्यातील एक गाडी घसरून पडली.दोघांना थोडेसे लागले पण फार काही झाले नाही. थोड्या वेळाने आम्ही त्याच गोष्टीची मजा लुटली. टिंगल टवाळी करत आम्ही पुढे जात असताना मध्ये एक तलाव लागला. मग काय सगळ्यांची photography, modelling बाहेर यायला लागली. त्याच तलावाचे फोटो काढताना हे २ अप्रतिम फोटो मला भेटले.
No comments:
Post a Comment