Showing posts with label fort. Show all posts
Showing posts with label fort. Show all posts

Saturday, 9 February 2013

इतिहासाची पुनरावृत्ती

इतिहासाची पुनरावृत्ती
इतिहासाची पुनरावृत्ती
असं म्हणतात की इतिहासाची पुनरावृत्ती होते, म्हणून इतिहास शिकणे गरजेचे आहे जेणेकरून इतिहासात झालेल्या चुका टाळून नवीन इतिहास रचता येईल.
पण फोटोतील हे भग्नावशेष अश्या ठिकाणाचे आहेत की जिथे काळ रोज मागे वळून पहात असेल आणि विचार करत असेल की ३५० वर्ष्यापुर्वीच्या इतिहासाची पुनरावृत्ती कधी होईल? कधी परत ते जाणत्या राजाचे स्वराज्य आणि सुराज्य येईल. कदाचीत काय सांगावे काळ इथेच रेंगाळून वाट पहात थांबलासुद्धा असेल.

Wednesday, 26 December 2012

Way to Heaven

Way To Heaven
Way To Heaven
Way To Heaven
Way To Heaven

"आजोबा, देव कुठे रहातो?" -
"तो बघ, तिकडे दूर आकाशात, ढगांच्या पलीकडे..."

लहानपणी हेच उत्तर मला मोठी लोक सांगत असत. आणि आता मी मोठा झाल्यावर लहान मुलांना हेच सांगतो.

हे आठवायचे कारण होते ती ही वाट, पुरंदरेश्वर मंदिराकडे जाणारी....A Way to Heaven....

Saturday, 27 October 2012

गोलघुमट

गोलघुमट
गोलघुमट
माणसाने कला, विज्ञान आणि तंत्र वापरून निर्माण केलेली हि अजोड आणि अप्रतिम वास्तुकला click  करण्याचा छोटासा प्रयत्न केला आहे 2009 मध्ये माझ्या पहिल्या LG Cookie KP500 3 Megapixel मोबाईल कॅमेर्यामधून.

Tuesday, 25 September 2012

पाऊलवाट

पाऊलवाट
पाऊलवाट
सिंहगड किल्ला.सप्टेंबरमधील एक धुंद संध्याकाळ. सोबत मी, माझी पत्नी आणि नुकतेच लग्न झालेला माझा चुलत भाऊ त्याच्या पत्नीबरोबर असे आम्ही चौघेजण मस्त रमत गमत, गरम कणीस खात इकडे तिकडे फिरत होतो. कुंद वातावरण, फुललेली अनेक रंगी फुले,वाहत असलेले झरे,कधी मध्येच येणारा पाऊस, तर कधी मधेच येणारे ढग, वातावरण अजून मस्त बनवत होते.

ढग काही सूर्याला बाहेर येवू देत न्हवते. आणि अशा मस्त वातावरणात आमचे फोटो काढण्याचे उद्योग चालूच होते. अशाच एका पाऊलवाटेवरून जात असताना सूर्य थोडासा आणि थोड्या क्षणासाठी बाहेर आला आणि अचानक मला त्याने हा सुंदर फोटो क्लिक करण्याचा अवसर दिला. माझे नशीब अजून जोरात होते ते यासाठी की एवढा प्रसिद्ध किल्ला आणि या जागी यावेळेस कोणीच न्हवते. प्लास्टिक किंवा पर्यटकांनी केलेला कचरासुद्धा न्हवता.त्यामुळे खूप कमी वेळ असूनसुद्धा मला हा फोटो क्लिक करता आला.

फोटो क्लिक केला आणि सूर्य परत ढगाआड  गेला. दुसरा फोटो क्लिक करण्याची त्याने संधी दिली नाही. खरच काही संधी एकदाच येतात. आपल्याला फक्त ती साधता यायला हवी आणि मी ती त्यावेळेस साधली.

एवढा मस्त नैसर्गिक प्रकाश होता की फोटोला digital alter करण्याची गरजच भासली नाही. आणि मला असे नैसर्गिक फोटो digitalली alter करू सुद्धा वाटत नाहीत. एकदा फोटो edit केला की त्यात काही मजा राहत नाही आणि तो फोटो original सुद्धा रहात नाही.

Tuesday, 28 August 2012

Wallpaper

इंद्रायणी आणि अभंग
 इंद्रायणी आणि अभंग
इंद्रायणी आणि अभंग
 इंद्रायणी आणि अभंग
इंद्रायणी आणि अभंग
 इंद्रायणी आणि अभंग
इंद्रायणी आणि अभंग
 इंद्रायणी आणि अभंग
इंद्रायणी आणि अभंग
 इंद्रायणी आणि अभंग
मला या फोटोंमध्ये नक्की काय पकडायचे आहे? आकाशी तळपणारा सूर्य, कि नदीवरचे तरंग आणि त्या तरंगावरती सूर्याने केलेली किरणांची पाखरण....? नाही मला त्या दिवशी वेगळेच काहीतरी capture करायचे होते.

हि तीच इंद्रायणी, जी तुकारामांची अभंग गाथा पोटात घेवून पावन झाली. हि तीच जागा जिथे तुकारामांनी सामान्यांची भंगलेली मने परत अभंग केली. जिथे एका विद्रोही कवीच्या १३ दिवसांच्या उपासानंतर इंद्रायणीने तिच्या काळजात जपून ठेवलेली गाथा त्याची त्याला परत केली....

तोच काळ, तीच वेळ, तसेच मनाची घालमेल करणारे वातावरण मला फोटोत आणायचे होते. आणि त्यासाठी black & white फोटोशिवाय मला दुसरा पर्यायाच दिसला नाही. हाच प्रयत्न मी फोटो काढते वेळेस केला. मला माहित नाही कि या प्रयत्नात मी कितपत यशस्वी झालो आहे....प्रयत्न तर केला आहे..शेवटी त्याचीच इच्छा, दुसरे काय...मी फक्त त्याची जादू कॅमेर्यात बंदिस्त करण्यासाठी धडपडणारा एक सामान्य माणूस,नुसते click करणारा एक common man.....