पाऊलवाट |
ढग काही सूर्याला बाहेर येवू देत न्हवते. आणि अशा मस्त वातावरणात आमचे फोटो काढण्याचे उद्योग चालूच होते. अशाच एका पाऊलवाटेवरून जात असताना सूर्य थोडासा आणि थोड्या क्षणासाठी बाहेर आला आणि अचानक मला त्याने हा सुंदर फोटो क्लिक करण्याचा अवसर दिला. माझे नशीब अजून जोरात होते ते यासाठी की एवढा प्रसिद्ध किल्ला आणि या जागी यावेळेस कोणीच न्हवते. प्लास्टिक किंवा पर्यटकांनी केलेला कचरासुद्धा न्हवता.त्यामुळे खूप कमी वेळ असूनसुद्धा मला हा फोटो क्लिक करता आला.
फोटो क्लिक केला आणि सूर्य परत ढगाआड गेला. दुसरा फोटो क्लिक करण्याची त्याने संधी दिली नाही. खरच काही संधी एकदाच येतात. आपल्याला फक्त ती साधता यायला हवी आणि मी ती त्यावेळेस साधली.
एवढा मस्त नैसर्गिक प्रकाश होता की फोटोला digital alter करण्याची गरजच भासली नाही. आणि मला असे नैसर्गिक फोटो digitalली alter करू सुद्धा वाटत नाहीत. एकदा फोटो edit केला की त्यात काही मजा राहत नाही आणि तो फोटो original सुद्धा रहात नाही.
beautiful photo
ReplyDeletephoto chhan ahech....ani je description lihilay te anakhin chhan ahe..kuthun anatos baba tu he bhari words...
ReplyDeleteThanks Niraj,
ReplyDeleteAre asach je suchat te lihito......lahanpani aani aata sudha marathi pustak vaachalyacha phaayada hoto.....