Sunday, 30 September 2012

तलाव

तलाव
तलाव

तलाव
तलाव
काही गोष्टी अश्या असतात कि ज्या कधीच ठरवून होत नाहीत. आणि चांगल्या भटकंती या छोट्या असल्या तरी अविस्मरणीय होतात. अशीच एक छोटी आणि कायम लक्षात राहील अशी भटकंती या गणेश चतुर्थीला घडली.

मित्रांबरोबर हिंजवडीच्या मागे एक पवना धरणाकडे जाणारा रस्ता आहे तिकडे फिरायला गेलो होतो.ठिकाणाचे नाव माहित नाही. प्रसिद्द ठिकाण नाही आहे हे काही.फोटोत जे नाव दिले आहे ते एक गाव आहे तिथले.त्याचेच नाव दिले आहे स्थळ म्हणून. पण येणाऱ्या काळात प्रसिद्द ठिकाण होईल सुद्धा. पर्यटन क्षेत्र बनेल सुद्धा. मग तिथे माझे जाणे बंद होईल कारण एकदा गर्दी वाढली कि मला ती ठिकाणे नकोशी वाटतात. कारण तिथे निसर्ग भेटत नाही तर एक माणसाने घाण केलेला, ओरबाडलेला निसर्ग रहातो. त्याची मनाची तगमग मग पहावत नाही.

४ गाड्या आणि आम्ही आठजण निघालो. वेळ कमी होता. पण भटकंतीला कधी काळवेळ आणि ठिकाण नसते. फक्त मनसोक्त फिरा,निसर्गाचा आनंद घ्या,मुक्काम किंवा ठिकाणच ठरलेले नसल्याने फक्त जिथपर्यंत जाता येईल तिथपर्यंत जायचे आणि मागे फिरू वाटले कि फिरायचे, थोडीशी स्वताची आणि निसर्गाची काळजी घ्यायची. तसेच आम्ही केले. या भटकंतीला थोडीशी काळी किनारसुद्धा होती.  कारण एक कुत्रा अचानक मध्ये आल्याने आमच्यातील एक गाडी घसरून पडली.दोघांना थोडेसे लागले पण फार काही झाले नाही. थोड्या वेळाने आम्ही त्याच गोष्टीची मजा लुटली. टिंगल टवाळी करत आम्ही पुढे जात असताना मध्ये एक तलाव लागला. मग काय सगळ्यांची photography, modelling बाहेर यायला लागली. त्याच तलावाचे फोटो काढताना हे २ अप्रतिम फोटो मला भेटले.

Tuesday, 25 September 2012

पाऊलवाट

पाऊलवाट
पाऊलवाट
सिंहगड किल्ला.सप्टेंबरमधील एक धुंद संध्याकाळ. सोबत मी, माझी पत्नी आणि नुकतेच लग्न झालेला माझा चुलत भाऊ त्याच्या पत्नीबरोबर असे आम्ही चौघेजण मस्त रमत गमत, गरम कणीस खात इकडे तिकडे फिरत होतो. कुंद वातावरण, फुललेली अनेक रंगी फुले,वाहत असलेले झरे,कधी मध्येच येणारा पाऊस, तर कधी मधेच येणारे ढग, वातावरण अजून मस्त बनवत होते.

ढग काही सूर्याला बाहेर येवू देत न्हवते. आणि अशा मस्त वातावरणात आमचे फोटो काढण्याचे उद्योग चालूच होते. अशाच एका पाऊलवाटेवरून जात असताना सूर्य थोडासा आणि थोड्या क्षणासाठी बाहेर आला आणि अचानक मला त्याने हा सुंदर फोटो क्लिक करण्याचा अवसर दिला. माझे नशीब अजून जोरात होते ते यासाठी की एवढा प्रसिद्ध किल्ला आणि या जागी यावेळेस कोणीच न्हवते. प्लास्टिक किंवा पर्यटकांनी केलेला कचरासुद्धा न्हवता.त्यामुळे खूप कमी वेळ असूनसुद्धा मला हा फोटो क्लिक करता आला.

फोटो क्लिक केला आणि सूर्य परत ढगाआड  गेला. दुसरा फोटो क्लिक करण्याची त्याने संधी दिली नाही. खरच काही संधी एकदाच येतात. आपल्याला फक्त ती साधता यायला हवी आणि मी ती त्यावेळेस साधली.

एवढा मस्त नैसर्गिक प्रकाश होता की फोटोला digital alter करण्याची गरजच भासली नाही. आणि मला असे नैसर्गिक फोटो digitalली alter करू सुद्धा वाटत नाहीत. एकदा फोटो edit केला की त्यात काही मजा राहत नाही आणि तो फोटो original सुद्धा रहात नाही.

Monday, 10 September 2012

इंद्रायणी आणि अभंग

इंद्रायणी आणि अभंग
 इंद्रायणी आणि अभंग
इंद्रायणी आणि अभंग
 इंद्रायणी आणि अभंग
इंद्रायणी आणि अभंग
 इंद्रायणी आणि अभंग
इंद्रायणी आणि अभंग
 इंद्रायणी आणि अभंग
इंद्रायणी आणि अभंग
 इंद्रायणी आणि अभंग
मला या फोटोंमध्ये नक्की काय पकडायचे आहे? आकाशी तळपणारा सूर्य, कि नदीवरचे तरंग आणि त्या तरंगावरती सूर्याने केलेली किरणांची पाखरण....? नाही मला त्या दिवशी वेगळेच काहीतरी capture करायचे होते.

हि तीच इंद्रायणी, जी तुकारामांची अभंग गाथा पोटात घेवून पावन झाली. हि तीच जागा जिथे तुकारामांनी सामान्यांची भंगलेली मने परत अभंग केली. जिथे एका विद्रोही कवीच्या १३ दिवसांच्या उपासानंतर इंद्रायणीने तिच्या काळजात जपून ठेवलेली गाथा त्याची त्याला परत केली....

तोच काळ, तीच वेळ, तसेच मनाची घालमेल करणारे वातावरण मला फोटोत आणायचे होते. आणि त्यासाठी black & white फोटोशिवाय मला दुसरा पर्यायाच दिसला नाही. हाच प्रयत्न मी फोटो काढते वेळेस केला. मला माहित नाही कि या प्रयत्नात मी कितपत यशस्वी झालो आहे....प्रयत्न तर केला आहे..शेवटी त्याचीच इच्छा, दुसरे काय...मी फक्त त्याची जादू कॅमेर्यात बंदिस्त करण्यासाठी धडपडणारा एक सामान्य माणूस,नुसते click करणारा एक common man.....